Download App

नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात? शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सांगितला PM मोदींचा प्लॅन ?

Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा (Lok Sabha 2024) प्लॅन काय असेल याची माहिती सध्या कुणाकडेच नाही. जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीतही निर्णय झालेला नाही. मात्र युतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपाचं काय प्लॅनिंग असू शकतं याचा खुलासा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात यंदा लढत चुरशीची होईल यात शंका नाही. या मतदारसंघावर केंद्रीय मंत्री राणे यांनी दावा सांगितला आहे राज्यसभा खासदारांनी लोकसभेत पाठविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची योजना आहे. कदाचित मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना सुद्धा लोकसभेचं तिकीट देण्याचा मोदींचा प्लॅन असू शकतो, असे संकेत मंत्री केसरकर यांनी दिले.

Lok Sabha 2024 : ‘आम्हीच ओरिजिनल, युतीचं पावित्र्य राखा’ राणेंनी सामंतांना फटकारलं

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपात केंद्रीय मंत्र नारायण राणे यांचं तिकीट कापलं जाईल असे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे, असा प्रश्न पत्रकारांनी केसरकर यांना विचारला. त्यावर केसरकर म्हणाले, याबाबतीत जे काही निर्णय होतात ते वरिष्ठ पातळीवरून होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण जर पाहिले तर निवडणुका या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्यात. त्याप्रमाणे केंद्रात अनेक जे मंत्री आहेत त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत. परंतु, नारायण राणे यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेमक्या काय योजना आहेत याबाबत मला आताच काही सांगता येणार नाही कारण याबाबत माझ्यापेक्षा राणे साहेबांना जास्त माहिती असणार.

नारायण राणे कुठूनही उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल कोकणात जी आत्मियता आहे त्या पार्श्वभुमीवर ते स्वतः जर उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कुणीही टिकू शकणार नाही ही आजही परिस्थिती आहे. परंतु त्यांनी आता लोकसभा लढवावी की राज्यसभा लढवावी हा त्यांचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्र्यांबाबतीत जे धोरण वरिष्ठांचं आहे त्यानुसार अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना निवडणुकीत उतरवत आहेत. याबद्दल मी आधिक काही बोलू शकणार नाही त्या पक्षाची लोकच जास्त बोलू शकतील. एक नेते म्हणून आमचा नारायण राणे यांना शंभर टक्के पाठिंबा आहे.

निरुद्योगी उद्योगमंत्री म्हणणाऱ्या राऊतांना सामतांनी खडसावलं; म्हणाले, मला काही मर्यादा..

शिंदे गट-भाजपात धुसफूस वाढली

किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आहेत. रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत चार वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या विजयात किरण सामंत यांचा मोठा वाटा आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या राजकारणात ते सक्रिय आहेत. या मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. ते स्वतः व्यावसायिक आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणतेही पद घेतले नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी विरोधी भूमिका घेत ठाकरे गटात जाण्याचे संकेत दिले होते. नंतर मात्र त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. परंतु, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ लढण्यासाठी भाजप सुद्धा आग्रही आहे. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज