Download App

रत्नागिरीचे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर कालवश

  • Written By: Last Updated:

रत्नागिरी : कोकणातील ख्यातनाम वकील व माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर (Bapusaheb Parulekar) (94) यांचे आज (27) पावसाळी 8.50 वाजता वृध्दपकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ( Former MP Bapusaheb Parulekar passed away)

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात एक बुद्धीवंत कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. चंद्रकांत काशिनाथ परुळेकर हे बापूसाहेब परुळेकर नावाने प्रसिद्ध होते. 1971 मध्ये त्यांनी जनता पक्षाकडून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांचा शामराव पेजे यांच्याकडून पराभव झाला. यानंतर ते 1977 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 1980 च्यामध्ये लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा धुव्वा उडाला होता. तेव्हा दोन खासदार निवडून आले होते. त्यात बापूसाहेब परुळेकर यांचा समावेश होता.

Subhedar: ‘आले मराठे…’; ‘सुभेदार’ सिनेमातील बहुप्रतिक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद 

जनता पक्षाचे खासदार म्हणून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले बापूसाहेब रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे जिल्हाध्यक्ष होते. बापूसाहेब यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सहभाग होता. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. बापूसाहेब परुळेकर रत्नागिरी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे प्रमुख होते. 1960 ते 1970 पर्यंत ते रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी व्हाईस चेअरमन आणि प्रेसिडेंट म्हणऊन अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांचे, शाळांचे काम पाहिलेले आहे. प्रमोटर मेंबर म्हणून रत्नागिरी जिल्हा रोटरी क्लबचे ते सदस्य होते.

पोस्टल ॲडव्हायझर कम्युनिटी फॉर महाराष्ट्र स्टेटचे १९७८ ते १९७९ पर्यंत, त्याचप्रमाणे रेल्वे युजर कम्युनिटी सेंट्रल झोनचे ते ॲग्रीकल्चर कौन्सिलर डेव्हलपमेंट सर्कल यासारख्या अनेक संस्थांवर सामाजिक सांस्कृतिक आणि राज्यस्तरीय कमिटी, समित्यांवर ते अध्यक्ष होते.

1978 ते 1979 पर्यंत ते पोस्टल अॅडव्हायसर कम्युनिटी फॉर महाराष्ट्र स्टेटचं अध्यक्ष होते. त्याचप्रमाणए रेल्वे युजर कम्युनिटी सेंट्रल झोनचे ते अॅग्रीकल्चर कौन्सिलर डेव्हलपमेंट सर्कल सारख्या अनेक संस्थावर सामाजिक सांस्कृतिक आणि राज्यस्तरीय कमिटी, समित्यांवरही ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा मार्गदर्शक हरपपल्याची भावना व्यक्त होतेय.

त्यांच्या पश्चात मुलगे अॅड. बाबा परुळेकर, पंकज परूळेकर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Tags

follow us