Download App

Kokan Railway : मालगाडी घसरली; कोकण रेल्वे रखडल्या; स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी

Kokan Railway : गणेशोत्सवासाठी (Ganesh Festival) चाकरमानी कोकणवासियांनी (Kokan) आपला मोर्चा कोकणाकडे वळविला होता. मात्र, आता गणेशोत्सव पार पडलायं. त्यानंतर पुन्हा मुंबईकडे (Mumbai) परतण्याच्या तयारीत असलेल्या कोकणासियांचा रेल्वे गाड्या अचानक रद्द झाल्याने खोळंबा झाला आहे. अनेक प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक! पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या गेटवरच पकडले 2 कोटींचे ड्रग्ज

कोकण रेल्वे मार्गावरील पनवेल ते कळंबोली दरम्यानच्या मार्गावर मालगाडी घसरल्याने ही वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ही मालगाडी रात्रीच्या सुमारास घसरल्याची माहिती समजत असून अद्याप ही मालगाडी हटवण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रेल्वे प्रशानसाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच इतर गाड्याही उशिराने धावणार असल्याची माहिती आहे.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकामुळे शरद पोंक्षे अडचणीत, 72 तासांची पाठवली नोटीस

वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने कणकवली रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेस रखडली असून मुंबईच्या दिशेने जाणारी तुतारी एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही गाड्या अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

“अन्यथा, लिपस्टिक आणि ‘बॉब कट’वाल्या संसदेत प्रवेश करतील…” : लालूंचा आणखी एक खासदार वादात

दरम्यान, कणकवली, कुडाळ सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडूंब गर्दी झाली असून ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या उशिराने धावणार आहेत. तब्बल 5 ते 10 तासाने उशिराने या गाड्या धावणार असल्याने प्रवाशांना 5 तास गाड्यांची वाट पाहावी लागणार आहे.

‘किस्से वर्ल्डकप’ चे वर्ष 1987! पैशांची चणचण, साळवेंची खेळी अन्… वाचा, रंजक किस्सा…

लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज संध्याकाळी मुंबईकडे जाणाऱ्या कोकणकन्या आणि तुतारी एक्सप्रेस रद्द झालीयं तर कोकण रेल्वे मार्गावरील ३ एक्सप्रेस अन्य मार्गाने मार्गस्थ केल्या आहेत. वाहतूक खोळंबल्याने 12 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ठाण्यावरुन रात्री 12 वाजता सुटलेली तुतारी एक्स्प्रेस सकाळी दहा वाजेपर्यंत दिवा स्टेशनवरच होती. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास गाडी तळोजा स्टेशनजवळ खोळंबली होती.

दरम्यान, रेल्वेला उशिर झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. स्टेशन्सवर गाड्या थांबत नसल्याने खाण्यापिण्याच्या वस्तू घेता येत नसल्याची तक्रार करत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

Tags

follow us