‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकामुळे शरद पोंक्षे अडचणीत, 72 तासांची पाठवली नोटीस
Me Nathuram Godse Boltoy :‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकामुळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) अडचणीत आले आहेत. या विरोधात मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत (Udai Dhurat) यांनी पोंक्षेना 72 तासांची नोटीस पाठवली आहे.त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
मी नथुराम गोडसे बोलतोय या नावाने एकाच वेळी दोन नाटके रंगभूमीवर येणार आहेत. मूळ नाटकाचे निर्माते माऊली प्रोडक्शनचे उदय धुरत नव्या संचात हे नाटक आणत आहेत. तर यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शरद पोंक्षे यांनी पुन्हा नथुरामचा वेष धारण करत नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे 50 प्रयोग करण्याची घोषणा केली आहे.
यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मूळ नाटकाचे दिग्दर्शक विनय आपटे यांचे बंधू लेखक-दिग्दर्शक विवेक आपटे यांनी धुरत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले. या संदर्भात पोंक्षे यांना दोन नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ आणि ‘नथुराम गोडसे बोलतोय’ ही दोन्ही शीर्षक धुरत यांच्याकडे नोंदणी केलेले आहे. स्क्रिप्ट आम्हाला दाखवावी किंवा नाटकाचे नाव बदलावे असे वकील ए.एल. गोरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंना स्वत:ची नखं ही वाघनखं वाटत असतील; संजय मंडलिकांचा टोला
यावेळी सौरभ म्हणाला की, माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभ्या राहिलेल्या या नाटकात टायटल रोल करण्याचे भाग्य लाभले. मी कोणाला कॉपी करणार नाही. तुलना होईल पण मी त्याचा विचार करत नसल्याचे सौरभ म्हणाला. उदय धुरत म्हणाले की हा प्रकार मराठी रंगभूमीसाठी घातक आहे. आम्ही पोंक्षे यांना 72 तासांची अंतिम नोटीस पाठवली आहे.