धक्कादायक! पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या गेटवरच पकडले 2 कोटींचे ड्रग्ज

धक्कादायक! पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या गेटवरच पकडले 2 कोटींचे ड्रग्ज

Pune Crime : पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचा (Pune Crime) आलेख वाढत चालला आहे. चोऱ्या वाढल्या आहेत. मध्यंतरी कोयता गँगचीही दहशत होती. खून, मारामारी, हल्ले, अंमली पदार्थांचे सेवन असे प्रकार वाढले आहेत. आता तर शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत आधिक माहिती अशी, पु्णे पोलिसांच्या गृह शाखेने ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून तब्बल 1 किली 75 ग्रॅम मेफिड्रो ड्रग्स जप्त केले. या जप्त केलेल्या एमडी ड्रग्सची किंमत जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे ड्रग्स येथे कुणी ठेवले असा प्रश्न निर्माण झाला असून आता पोलीस त्याचाच तपास करत आहेत.

पुणेकरांची PMPL झाली कॅशलेस, सुट्ट्या पैशांची कटकट संपली

ड्रग्जचे हे हाय प्रोफाइल रॅकेट असून यात आरोपी ललित पटेल आणि आणखी दोन जण गु्ंतल्याची प्राथमिक माहिती आहे. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी त्याला याआधीच पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. त्यानंतर पटेलला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा तो हे रॅकेट कसे चालवतो याचा तपास पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात रोज हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक राज्यातील विविध ठिकाणांहून येत असतात. त्यामुळे दवाखान्यात कायमच वर्दळ असते. अशा परिस्थितीत दवाखान्याची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. मात्र, याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. आता तर दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर कोट्यावधींचे ड्रग्ज सापडते म्हटल्यानंतर प्रकरण गंभीर आहे. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे.

पुणे हादरले ! सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाला लॉजबाहेरच संपविले !

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube