पुणेकरांची PMPL झाली कॅशलेस, सुट्ट्या पैशांची कटकट संपली

  • Written By: Published:
पुणेकरांची PMPL झाली कॅशलेस, सुट्ट्या पैशांची कटकट संपली

Google Pay service in PMPL : पीएमपीएल (PMPL) ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एक प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. या दोन्ही शहरांमधून दररोज किमान दहा ते बारा लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, अनेकदा सुट्या पैशांवर कंडक्टर आणि प्रवासी यांचे वाद व्हायचे. त्यामुळं पीएमपीएलने गुगल पे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.  उद्या (ता. 1) पीएमपीएलमध्ये गुगल पे (Google Pay) सेवा सुरू होणार आहे. त्यामुळं पुणेकरांना आता पीएमपीलची तिकिटे कॅशलेस (cashless) पद्धतीने खरेदी करता येणार आहेत.

Video : तामिळनाडूत पर्यटकांची बस दरीत कोसळली, भीषण अपघातात आठ ठार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाला आता सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या सात वर्षात ऑनलाइन व्यवहारांना वाढता प्रतिसाद आहे. छोटे-मोठे व्यवहारही डिजिटल पद्धतीने होत आहेत. मात्र पीएमपीएलमध्ये डिजिटल तिकीट व्यवस्था अस्तित्वात नव्हती. त्यामुळे तिकीट वाटपावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वारंवार वाद होत व्हायचे, अनेकदा भ्रष्टाचारही व्हायचा. अखेर पीएमपीएलचे (pmpl) अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंग यांनी पीएमपीएल बसेसमध्ये क्यूआर कोड म्हणजेच गुगल पे (cashless) तिकीट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळाला असून पीएमपीएलच्या तिकीटीकरणातील भ्रष्टाचार आता थांबणार आहे.

बाणेर डेपो अंतर्गत 16 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर याची प्रथम चाचणी घेण्यात आली. या चाचणीच्या यशानंतर अध्यक्ष सिंह यांनी ही Google Pay सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्यापासून (दि. 1) ही सेवा सुरू होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 12.00 वाजता कोथरूड आगर येथे या सेवेचे उद्घाटन होणार आहे.

वाघनख भारतात आणण्यासाठी हालचालींना वेग, करारासाठी मुनगंटीवारांचा लंडन दौरा 

त्यामुळं आता प्रवाशांना क्यू आर कोड स्कॅन करूनही युपीआयद्वारे पेमेंट करता येणार आहे. कॅशलेस पेमेंट सुविधेमुळं ज्या जुन्या सविधा चालू आहेत, त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. या नव्या सुविधेमुळं सुट्या पैशांची समस्या संपुष्ठात येईल. शिवाय, कॅशलेस व्यवहाराचाल चालना मिळेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube