वाघनख भारतात आणण्यासाठी हालचालींना वेग, करारासाठी मुनगंटीवारांचा लंडन दौरा

वाघनख भारतात आणण्यासाठी हालचालींना वेग, करारासाठी मुनगंटीवारांचा लंडन दौरा

Shivaji Maharaj Vaghnakh: छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे (Waghnakh) ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्यात येणार आहेत. याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) रविवारी (1 ऑक्टोबर) रोजी रात्री रवाना होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे तसेच सांस्कृतीक कार्य विभागाचे प्रधान सचिव, पूरातत्व विभागाचे संचालक जाणार आहेत.

एक ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडनकडे (london) रवाना होण्यापूर्वी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून राज्य शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

शिवरायांच्या वाघनख्यांवरून आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवारांमध्ये राजकीय ‘ओरखडे’

या दौऱ्यात लंडन येथील टॅव्हिस्टॊक चौक येथे 2 ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. तेथील विविध भारतीय तथा महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून मुनगंटीवार चर्चा करणार आहेत. मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहलायचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वक्षऱ्या होणार आहेत.

Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, उत्तर महाराष्ट्रातून 4 दिवसांत पाऊस मागे फिरणार

यानंतर लगेच दूरदृश्याप्रणालीद्वारे पत्रकार परिषद होणार असून संस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.या दौऱ्यात सुधीर मुनगंटीवार हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या लंडन येथील निवासस्थानास भेट देणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube