शिवरायांच्या वाघनख्यांवरून आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवारांमध्ये राजकीय ‘ओरखडे’

  • Written By: Published:
शिवरायांच्या वाघनख्यांवरून आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवारांमध्ये राजकीय ‘ओरखडे’

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखे (Tiger Claws) लंडनमधील संग्रहालयातून भारतात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला हे वाघनखांचे आगमन मुंबईत आणण्यात येणार आहेत. अनेक शहरातील संग्रहालयात हे वाघनखे नागरिकांना बघण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. तीन वर्षांसाठी हे वाघनखे भारतात असणार आहे. परंतु आता या वाघनख्यांवरून एकमेंकावर राजकीय ओरखडे ओढले जात आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यामध्ये यावरून आता जोरदार जुंपली आहे. या वाघनखांबाबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुनगंटीवार यांना थेट पुरावेच मागितले आहेत. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पहाटे पावणे चार वाजता झोपायला गेलो, इतक्यात…; शरद पवारांनी सांगितल्या किल्लारी भूकंपाच्या आठवणी

आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकावर टीका करताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. शिवरायांनी वापरलेली वाघनखे परतावा म्हणून येणार आहेत की उसनवारीवर परत येणार आहेत? वाघनखे परतावा म्हणून येणार आहेत की लोनवर येणार आहेत ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे, ही वाघनखे शिवरायांनी वापरलेली आहे की नाहीत, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. ही वाघनखे तीन वर्षांसाठी उसनवारीवर देण्यात आलेली आहेत. यावर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. शिवप्रेमींच्या भावनांशी खेळू नका, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय.


रमेश कदम यांच्या आरोपांवर भुजबळांचा पलटवार, ‘त्यांना ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहीत नसेल’

आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्त्युतर दिले आहे. इंग्लंडमधून आणण्यात येणाऱ्या वाघ नखांबद्दल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन होईल. माहितीच्या अभावी ते बोलत आहे. मात्र, त्यांच्या वाक्यामध्ये दोन मुद्दे आहेत. त्यांच्या शंकेचे निरसन पुरातत्व विभाग ऐतिहासिक पुरावे देऊन त्यांच्या शंकेचे निरासन करेल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

या आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर शंका उपस्थित केली होती. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांना प्रत्येक बाबींचे पुरावे पाहिजेत, अशी सवयच त्यांना लागली असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे. आता ते त्यांच्यासोबत गेले, तेव्हापासून ते प्रभू रामचंद्र हेच काल्पनिक आहेत, अस म्हणत श्री रामाचेही पुरावे मागत आहेत, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube