पुणे हादरले ! सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाला लॉजबाहेरच संपविले !

  • Written By: Published:
पुणे हादरले ! सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाला लॉजबाहेरच संपविले !

पुणे : दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज तर शहरातील सिंहगड रोडवर एक खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांचा बांधकामाच्या लोखंडी सळई व भरील लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून निर्घृण खून केला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाणे (Sinhagad Road Police Station) आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, त्याच्या खुनाचे कारण समजू शकले नाही

गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडल्यानंतर सायंकाळी सिंहगड रोडवर ही खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय ढुमे (वय ४३, रा. सिंहगड रोड, पुणे) हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे चिरंजीव असून त्यांचे त्यांचे अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांशी मैत्रीचे संबंध होते. तसेच अनेक राजकारणी व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध होते. क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असतांना चार ते पाच हल्लेखोरांनी ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. त्यामुळं गंभीर जखमी झालेल्या विजय यांचा मृत्यू झाला.

Ujjain Rape Case : तिने मदतीसाठी याचना करुनही मदत केली नाही; पोलिसांकडून पोक्सोंतर्गत गुन्हा… 

आज सायकांळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी सांगितले की, सदरचा खून चाकूने नव्हे तर डोक्यावर जाड लोखंडी रॉडने व लाकडी दांडक्याने वार करून करण्यात आला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे पोलीस तीन ते चार आरोपींचा शोध घेत आहेत, अद्याप खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालं नसल्याचं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube