राजापूर मतदारसंघ : अजितदादांच्या मनातील उमेदवार ठरला!

Rajapur Contituency :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, लांजा – राजापूर विधानसभा मतदारसंघातील अजित यशवंतराव यांच्या उपस्थितीत राजापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्याशी मतदारसंघातील […]

Letsupp Image   2023 06 28T184206.016

Letsupp Image 2023 06 28T184206.016

Rajapur Contituency :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, लांजा – राजापूर विधानसभा मतदारसंघातील अजित यशवंतराव यांच्या उपस्थितीत राजापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडली.

या बैठकीत आगामी निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्याशी मतदारसंघातील विविध विकासकामे, पक्ष संघटना व इतर प्रलंबीत प्रश्न इत्यादी विषयांवर सखोल चर्चा झाली. या चर्चेअंती अजितदादा यांनी सदरचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतरी मदत करणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले.

.. म्हणून फडणवीसांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला; नाथाभाऊंनी केला धक्कादायक गौप्यस्फोट

तसचे अजिदादांनी अजित यशवंतराव यांना  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघात अधिक जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा आहे. 2014 साली अजित यशवंतराव यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा शिवसेनेच्या राजन साळवी यांचा विजय झाला होता. 2014 या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप या चारही पक्षाच्या उमदेवारांनी निवडणूक लढवली होती.

भाजप की काँग्रेस… बीआरएस कोणाची टीम? केसीआर यांनी अखेर पक्षाचं नावचं सांगितलं!

सध्या या मतदारसंघात राजन साळवी हे आमदार असून ते सध्या ठाकरे गटासोबत आहे. अशातच अजित यशवंतराव यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. जर अजितदादांनी अजित यशवंतराव यांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीची तयारी होत असताना ठाकरे गटाच्या जागेवर राष्ट्रवादी आपला उमदेवार देणार का याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

Exit mobile version