.. म्हणून फडणवीसांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला; नाथाभाऊंनी केला धक्कादायक गौप्यस्फोट
Eknath Khadse criticized Devendra Fadnavis : सध्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात जोरदार खडाजंगी रंगली आहे. खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर ते आमच्या परिवारात राहिले असते अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता खडसेंनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
खडसे म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतो. त्यामुळे त्यांनी(देवेंद्र फडणवीस) मला अडकवण्याचा प्रयत्न केला. मला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला गेला. मी जमिनीच खरेदी केलेली नाही. मग जमिनीच्या व्यवहारात तोंड काळं करण्याचा काय संबंध, असा सवाल खडसेंनी विचारला.
ते पुढं म्हणाले, फडणवीस सध्या नैराश्यात आहेत. त्यामुळे बालिशपणाने टीका करत आहेत. त्यांनी हा बालिशपणा सोडावा. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे खडसे म्हणाले. अलीकडच्या काळात विचित्र परिस्थिती पहायला मिळत आहे. ते कधी समोरच्याला म्हणतात तुमचे सांगाडे बाहेर काढेन तर कधी काहीही बोलतात, अशी टीका खडसे यांनी केली. खडसे यांनी आज एबीपी माझा वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, तुम्ही जमिनीत तोंड काळं केलं. पण, जमिनीचा तो व्यवहार नियमांनुसारच झाला आहे. माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे खडसे म्हणाले. आज तुम्ही मात्र भ्रष्ट लोकांना घेऊन मंत्रिमंडळ तयार केलं आहे. यात आमदारही आहेत. त्यामुळे कुणी तोंड काळ केलं हे बाजूला राहू द्या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव कधी देणार ते आधी सांगा, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
‘संभाजी भिडेंना अटक करा’; भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांचा संताप
मी नालायक होतो तर इतकी वर्षे माझ्या हाताखाली काम का केलं
मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांसाठी अजित पवार आपल्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं. त्यांच्याबरोबर संसार केला. मग अजित पवार त्यांचे मालक होते का?, त्यांनी आता मालक का बदलवून टाकला?, त्या काळात का नाही बदलला? असे सवाल करत अशा गोष्टी बोलणं म्हणजे हा बालिशपणा आहे. अशा गोष्टी बोलण्यापेक्षा आपले कर्तुत्व सिद्ध करा. कापसाला भाव द्या. कुणाचं तोंड काळं केलं हे जगाला माहिती आहे. ते कशाला बोलता? मी जर नालायक असेल तर अशा नालायक माणसाच्या हाती तुम्ही इतकी वर्षे का काम करत राहिलात? असा रोखठोक सवाल खडसे यांनी फडणवीस यांना केला.