Konkan Graduate Constituency : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी (Konkan Graduate Constituency) समोर आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे अभिजीत पानसे आता उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली होती. यानंतर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निर्णयाची माहिती दिली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन आम्ही माघार घेत आहोत असे सरदेसाई यावेळी म्हणाले.
मनसेने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता भाजपसाठी ही निवडणूक सोपी झाली आहे. या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना सरदेसाई म्हणाले, दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत फडणवीसांनी विनंती (Devendra Fadnavis) केली. त्यांच्या या विनंतीला मान देऊन कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मनसे लढणार नसल्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयानुसार आता अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत.
LokSabha Election Result : मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या
कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेला मानणारा पदवीधर वर्ग मोठा आहे. जर या मतदारसंघात मनसेने उमेदवार दिला असता तर भाजपाच्या मतांवर त्याचा निश्चित परिणाम झाला असता. त्यामुळे भाजपाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. देवेंद्र फडणवीसांनी सूत्रे हाती घेतली आणि राज ठाकरेंना विनंती केली. त्यांच्या या विनंतीचा मनसेनेही विचार करत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
दरम्यान एकीकडे राज्यातील राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला कोणत्याही अटी शर्थींविना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये कोकण पदवीधर मतदार संघात उमेदवारही दिला होता. त्याचबरोबर ही उमेदवारी मनसेची महायुती म्हणून असेल तर भाजपच्या येथील विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, असे काही घडले नाही.
Raj Thackeray : वसंत मोरेंबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत हात जोडले
येत्या 24 जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानेही येथे उमेदवार दिला आहे. शिवसेनेकडून संजय मोरे यांनी अर्ज भरला आहे. परंतु, या घडामोडींनंतर मोरे देखील अर्ज मागे घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघात निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.