Raj Thackeray : वसंत मोरेंबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत हात जोडले
Raj Thackeray on Vasant More : वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला सोडचिठ्ठी ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर त्यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली. दरम्यान, राज ठाकरेंना (Raj Thackeray) वसंत मोरेंविषयी विचारले असता त्यांनी भाष्य करणं टाळलं.
Mahadev Betting App प्रकरणात मुंबई कनेक्शन उघडकीस, ‘हा’ अभिनेता आला अडचणीत
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना वसंत मोरे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या पत्रकारांच्या दिशेने केवळ हात जोडले आणि ते उठून पत्रकार परिषद सोडून निघून गेले. यानंतर पदाधिकाऱ्यांना बाईट देऊन जा, असं ते म्हणाले. तेव्हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हशा पिकला.
‘रीलस्टार’ सिनेमात नागराजच्या बंधूंची वर्णी; मुख्य भूमिकेत झळकणार भूषण मंजुळे
वसंत मोरे हे वंचितूकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळं पुणे लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान, आता वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मात्र काय करावं, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
फाइल उघडली गेल्याने राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिल्याचे संजय राऊत म्हणाले होते. याविषयी विचारले असता ते राज ठाकरेंनी नाव न घेता राऊतांवर टीका केली. ते म्हणाले, ज्यांना कावीळ झालेली असते, त्यांना जग पिवळे दिसते. ते आताच बाहेर आले आहेत. त्यामुळं त्यांचा विचार तसा असू शकतो, असं राज ठाकरे म्हणाले.
महायुतीला पाठिंबा दिला आता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, यावर मी अजून काहीच विचार केलेला नाही. पुढे पाहू काय करायचं, असं राज ठाकरे म्हणाले.