Download App

‘राणे साहेबांना लीड कमी मिळालं तर निधीही कमी देणार; नितेश राणेंचा सरपंचांना थेट इशारा

Nitesh Rane Speech in BJP Worker Meeting : सरपंचांसहित कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकांच्या वेळी जी यंत्रणा राबविली तीच यंत्रणा आता लावा. येत्या ४ जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेणार आहे. मला हवा तसं लीड मिळालं नाही तर मागणी असलेला निधी मिळणार नाही. मग मात्र तक्रार करू नका, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नितेश राणे यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तर विरोधकांनीही राणेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

नितेश राणे ‘वेडा’ आमदार, पोलिसांनी दुर्लक्ष करावं; आंबेडकरांचा राणेंवर मार्मिक भाष्य

महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. तर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक आहेत. तिकीट आपल्यालाच मिळेल असे समजून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. यानंतर काल सिंधुदुर्गातील देवगड येथे आयोजित मेळाव्यात आमदार नितेश राणे यांनी हा इशारा दिला.

राणे म्हणाले, जेव्हा नारायण राणे उमेदवार म्हणून समोर येतील तेव्हा 80 ते 85 टक्के मतदान आपल्याला करायचे आहे. सर्वांचा हिशोब घेऊन मी बसणार आहे. जिथे लीड कमी मिळेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत नारायण राणे विजयी झालेच पाहिजेतत, असे नितेश राणे यावेळी म्हणाले. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात संजय राऊतांवर घणाघाती टीका केली. संजय राऊत खरंच वेडा झालाय अशी टीका राणे यांनी केली.

अशोक चव्हाण यांचा फक्त ट्रेलर, तीन तासांचा पिक्चर बाकी; नितेश राणेंचा मोठा दावा

follow us