Aaditi Tatkare : विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, पण चुकलं तर अजितदादांकडून आणि चांगलं झालं तर इतरांकडूनच, असं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी (Aaditi Tatkare) शरद पवार गटाला सुनावलं आहे. दरम्यान, तटकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तटकरे बोलत होत्या.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय – मंत्री विखे पाटील
मंत्री तटकरे म्हणाल्या, मागील दोन वर्षांपूर्वी काय झालं तेव्हाचे पालकमंत्री कसे होते? त्यावेळचे सर्व निर्णय हे पक्षश्रेष्ठींकडूनच घेतले जात होते. आता सर्व गोष्टींसाठी विरोधक आरोप करीत आहेत. काही चुकलं तर अजितदादांकडूनच आणि चांगलं झालं तर इतरांकडून असं बोलणं चुकीचं असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
मोठा दिलासा! नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय
दरम्यान, मागील काही दिवसांपासून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील रायगडच्या पालकमंत्र्यांवर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. त्यावरच बोलताना आदिती तटकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मागील 30 वर्षांपासून अजितदादा राष्ट्रवादीचा महत्वपूर्ण घटक असून तरुणांना उमेदवारी देऊन निवडून आणलंयं. नेतृत्वांनी किंवा पक्ष श्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो आज भूमिका वेगळी घेतल्यानंतर दुसऱ्यावर एकट्यावर टाकायचं आणि आरोप करायचे याच्यात काही तथ्य नसून दहावेळी जुन्या गोष्टी उकरुन काढण्यात काय अर्थ? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही ‘त्या’ दिवसाची…”
यावेळी बोलताना महानंद डेअरीबद्दलही त्यांनी भूमिका मांडली आहे. मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून अनेक अफवा पसरवल्या जात आहे. अमुक गोष्टी इकड-तिकडं जात असल्याची अफवा पसरवत आहेत. राज्य सरकार महाराष्ट्राला कसं प्रगतशील बनवता येईल त्यासाठीच प्रयत्न करत असून जरी काही निर्णय झाला असेल तर यापेक्षाही अधिकच चांगलं राज्य सरकार उपलब्ध करुन देईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात जाहीर केलंयं, कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकलं पाहिजे, अनेकदा आरक्षणासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण टिकलं नाही, त्यामुळे वारंवार समाजाचा भ्रमनिरास होण्यापेक्षा टिकणारंच आरक्षण देण्याची आमची भूमिका असल्याचं मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.