‘चाटूगिरीचा उत्सांग’ म्हणत आमदार नितेश राणेंनी पुन्हा राऊतांना डिवचलं

सजंय राऊतांमध्ये चाटूगिरीचा उत्सांग असून त्यांच्या चाटूगिरीला खरोखर दाद दिली पाहिजे, ते 24 तास चाटूगिरी कसा करु शकतात, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना डिवचलं आहे. दरम्यान, संजय राऊतांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज […]

Nitesh Rane

Nitesh Rane

सजंय राऊतांमध्ये चाटूगिरीचा उत्सांग असून त्यांच्या चाटूगिरीला खरोखर दाद दिली पाहिजे, ते 24 तास चाटूगिरी कसा करु शकतात, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राऊत यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना डिवचलं आहे. दरम्यान, संजय राऊतांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

आमदार नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांच्या जीभेच संशोधन करुन घेण्याबाबत मी WHO ला पत्र लिहिणार आहे. कारण एखादा व्यक्ती 24 तास कशी काय चाटूगिरी करु शकतो, त्याच्या चाटूगिरीला खरंच दाद दिली पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवालांना पाठिंबा देणार का? ओवेसी म्हणाले- ‘मी कधी…’

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सचिन तेंडूलकर, विराट कोहली असल्याचे गौरवोद्गार संजय राऊतांनी काढले होते. त्यावरुन नितेश राणेंनी राऊतांवर तोफ डागली आहे. ते म्हणाले, जगाची प्रतिमा उंचावण्याच काम नक्कीच सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांनी केलं आहे. पण राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताची हिंदु धर्माची जी बदनामी करीत आहेत, ते संजय राऊत यांना भांडूपमध्ये बसून कळतंय का? असा सवालही त्यांनी केला आहे.

खलिस्तानावाद्यांच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणतात, ‘मोहब्बत की दुकान’…; अमेरिकेत नेमकं काय झालं?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात जात असतात तेव्हा विदेशातले पाहुणे त्यांना पाहुन भारत माता की जय म्हणतात. पण राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत जात असतात तेव्हा खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

काल परवाच्या राहुल गांधी कार्यक्रमात भारताचं राष्ट्रगीत सुरु असताना परदेशी साधे उठून उभाही राहिले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. सोबतच राहुल गांधींवरही त्यांनी टीकेची तोफ डागली आहे.

Exit mobile version