Download App

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन राज ठाकरेंनी कोकणवासियांना सुनावलं…

Raj Thackeray On Mumbai-Goa Road : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) जाहीर सभा झाली त्यावेळी राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Road)कामाला होत असलेल्या विलंबावरुन कोकणवासियांना चांगलंच सुणावलं आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज कोकणामध्ये आलोय, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण प्रलंबित राहण्याची कारणं किंवा ते प्रश्न उभी राहण्याची कारणं तुम्हीच आहात. त्याच त्याच व्यापारी लोक प्रतिनिधींना निवडूण देऊन त्याच त्याच पक्षांना निवडूण देऊन त्या पक्षाने आख्या कोकणाचा व्यापार करुन ठेवलाय, तुम्ही तिथेच तुम्ही तसेच, आणि तीच तीच माणसं निवडून येताहेत.

राज्य सरकारमध्ये त्यांनाही किंमत नाही. कारण त्यांची त्यांची किंमत झालेलीच आहे. मागच्या वेळी मी कोकणाच्या रस्त्यावरुन आलो होतो, 2007 साली या मुंबई-गोवा मार्गाचं काम सुरु झालं, अजून काम पूर्ण होत नाही, काय करताहेत लोकप्रतिनिधी कुठं आहेत तुमचे आमदार, खासदार? कारण तेच तेच लोकं तुम्ही निवडून देत आहेत. त्यांना फरकच पडत नाही.

त्यांचं असं म्हणणं आहे की, काम केलं काय अन् नाही केलं काय ही लोकं आपल्याला निवडून देणार आहेतच. तुमच्याबद्दल आपुलकी तर शून्य आहे या लोकांना. 2007 साली सुरु झालेला रस्ता आज 2023 पर्यंतही पूर्ण होत नाही. जवळपास 16 वर्षानंतरही पूर्ण होत नाही. मागच्यावेळी मी जेव्हा या रस्त्यावरुन गेले त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना फोन केला, त्यांना म्हणालो त्या रस्त्याकडं बघा जरा, त्यावेळी फडणवीस म्हणाले की, तुम्ही नितीन गडकरींशी बोलून घेता का? मी म्हणालो हो बोलतो.

मी गडकरींना फोन केला, त्यांना सांगितलं की काय अवस्था झाली आहे, त्या रस्त्याची? नितीन गडकरी म्हणाले की, काय करणार त्या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले, ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी एकदातरी विचारलं का, की हे कसे काय पळून गेले? या लोकांना तुमच्या फक्त मतदानाशी संबंध आहे.

मतदान करा तुमचे तुम्ही आमचे आम्ही, तोच समृद्धी महामार्ग बघा, नागपूरपासून मुंबईपर्यंत आला, आता नाशिक, शिर्डीपर्यंत आला. सुरुपण झाला. काळ काय तर चार वर्षात नागपूर ते शिर्डी काम पूर्ण होऊन त्यावर गाड्या फिरायला लागल्या. आमच्या कोकणातला रस्ता 16-16 वर्ष पूर्ण होत नाही, असा खोचक टोलाही यावेळी राज ठाकरेंनी लगावला आहे.

Tags

follow us