रत्नागिरी : शिवसेनाप्रमुखांची (Balasaheb Thackeray)सावली म्हणून आम्ही काम केलं आहे. अनेक लोकांना मातोश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलंय. नारायण राणे (Narayan Rane)गेल्यानंतर पक्ष संकटात आला. त्यानंतर वर्षभर गाडीत पुढं घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हता. पहिल्यांदा गोळी मी झेलेल पण तुम्हाला धक्का लागू देणार नाही, हे मी शिवसेनाप्रमुखांना मी सांगत होतो. त्याची परतफेड तुम्ही केली का? तुम्ही सर्वांना ज्याचे त्याचे जिल्हे पालकमंत्री म्हणून दिले, पण मला दुसरीकडं द्यायचे. योगेश कदमला पाडण्यासाठी उद्धवजी (Uddhav Thckeray)काय काय म्हणत होते, तू चिठ्ठी लिह, तो सुभाष देसाई बदमाश शेळी, मेंढी साला सर्वात पुढं असंही ते म्हणाले. उद्धवजी शिवसेनाप्रमुख रामदास कदमसारख्या (Ramdas Kadam)वाघांना सांभाळायचे तुम्ही सुभाष देसाईसारख्या (Subhash Desai)शेळ्या मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यामधला फरक आहे अशी घणाघाती टीका यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. आज रत्नागिरी (Ratnagiri)जिल्ह्याच्या खेडमधील गोळीबार मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे झोपतात कधी? उठतात कधी? याचं संशोधन सर्वांचं चालू आहे. म्हणजे दिवसरात्र काम करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचं यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं आहे. याचवेळी त्यांनी आपले चिरंजीव योगेश कदम यांच्या भाषणाची स्तुतीदेखील केली. त्याबद्दल ते म्हणाले की, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं, मुख्यमंत्री शिंदेंचा ‘गोळीबार’
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी संघटना म्हणून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सुरु केली. ही एकच गोष्ट आज उद्धव ठाकरे खरी बोलत आहेत. ते एवढं एकच सत्य सांगत आहेत. त्यावेळी ते म्हणाले की, उद्धवजी होय बाळासाहेबांनीच शिवसेनेला जन्म दिला. त्याचवेळी बाळासाहेब असंही म्हणाले होते की, ज्या दिवशी मला कॉंग्रेससोबत, राष्ट्रवादीसोबत जावं लागेल, त्यादिवशी शिवसेना नावाचं दुकान बंद करील, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब बोलले होते की नाही, बोला उद्धवजी असा सवालही यावेळी रामदास कदम यांनी विचारला.
कदम म्हणाले की, बोला ना रामदास कदम काय बोलत असेल, तुम्ही बघत असाल. तुमची सभा केवढी झाली ही सभा केवढी झाली? हे तुम्ही बघत असाल गपचूप असही ते म्हणाले. कदम यावेळी म्हणाले की, त्या भास्कर जाधवचे कोणी चमचे असतील तर त्याला म्हणावं जरा जाऊन बघ सगळी ट्रॅफिक जाम आहे. सभेवर उपस्थित असल्यापेक्षा चारपटीनं माणसं बाहेर उभी आहेत. शिंदे साहेब शिवाजी पार्कपण कमी पडला असता असंही यावेळी रामदास कदम म्हणाले.
शिवसेना मोठी कोणाची आहे? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात दाखवून दिलं आहे. त्यामुळं त्याच दिवशी हे समजलं. मुद्दा असा आहे की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की, सोनिया गांधीसोबत कधी जाणार नाही, उद्धव साहेब तुम्ही काय केलं? असा सवालही यावेळी कदम यांनी केला. शिवसेनाप्रमुख तुमचे वडील आहेत ना मग तुम्ही त्यांच्या विचारांशी बेईमानी का केली असाही सवाल केला. शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी का केली? असंही ते म्हणाले.
आज मला सांगा 2009 ला गुहाघरमधून तिकीट दिलं. मी दापोलीमधून मागितली होती. तिथं आपल्याच एका नेत्याला सांगून मला पाडलं. कशासाठी? तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून असाही आरोप यावेळी रामदास कदम यांनी केला. राज्याचा विरोधीपक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो. पण मी मुख्यमंत्री व्हायला नको म्हणून 2009 मध्ये तुम्ही मला पाडलं. तो जाधव काय त्याची औकात काय मला पाडायची? असे शंभर जाधव मी खिशात घेऊन फिरतो असाही इशारा यावेळी कदम यांनी यावेळी दिला.
पण उद्धवजी तुम्ही मला पाडलं. तुम्ही मला धोका दिलात. मला गाफिल ठेवलं. दापोलीतही योगेश कदमला पाडण्याचा प्रयत्न त्याच नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी केला असा आरोपही केला. उद्धव ठाकरे मला चार वर्ष भेटले नाहीत. माझ्या मुलाला सहा महिने भेटले नाहीत ते समजू शकतो. मी काय तुमचं घोडं मारलं होतं? असा सवालही त्यांनी यावेळी केला.