शिवसेना गहाण ठेवली.., रामदास कदमांनी थेट उध्दव ठाकरेंना डिवचलं

रत्नागिरी : मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. कदम रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. कदम म्हणाले, ज्या दिवशी आम्हांला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही शिवसेना नावाचं दुकान बंद करू, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र, तुम्ही सेना-भाजपमधून निवडून आले […]

Untitled Design   2023 02 10T123136.718

Untitled Design 2023 02 10T123136.718

रत्नागिरी : मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. कदम रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

कदम म्हणाले, ज्या दिवशी आम्हांला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा आम्ही शिवसेना नावाचं दुकान बंद करू, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र, तुम्ही सेना-भाजपमधून निवडून आले आणि मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवल्याचा घणाघात उध्दव ठाकरे यांचं नाव न घेता केला आहे.

Women’s T20 World Cup : स्पर्धेला आजपासून रंगणार, पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका- श्रीलंका भिडणार

तसेच तुम्ही भाजप-सेना युतीतून निवडून आले आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला आहात, गद्दारी तुम्ही केली हे पाप असल्याचंही ते म्हणाले आहेत. ज्या दिवशी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले तेव्हापासून बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, असं काम तुम्ही केल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

Ajitdada मुख्यमंत्री झाल्यास राज्य 25 वर्षे पुढे जाणार: निलेश लंके

तसेच रामदास कदमांनी उध्दव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे शरद पवार यांनाही सोडलं नाही. शरद पवारांवर गंभीर आरोप यावेळी त्यांच्याकडून करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उध्दव ठाकरे यांचा गेम केला आहे, जे पवारांना बाळासाहेब ठाकरे असताना जमलं नाही ते आत्ता शरद पवारांनी केलं असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

दरम्यान, आता उध्दव ठाकरे गटाची आणि वंचितची युती झाली असून उध्दव ठाकरेंच्या वाट्याला येणाऱ्या जागांमधूनच त्यांना प्रकाश आंबेडकरांना जागा द्यावे लागणारे आहे, त्यामुळे असं झालं तर आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या तोंडात तुप आणि साखर घालणार असल्याची खोचक टीकाही त्यांन केलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीच्या सभेनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरु आहे. अशातच आता उध्दव ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी घणाघात केला आहे, यावर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version