Download App

मोठी बातमी! सिंधुदु्र्गात एसटी बस अन् रिक्षाचा भीषण अपघात; चौघे जण जागीच ठार

बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे.

Sindhudurg Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत (Sindhudurg Accident) चालली आहे. भरधाव वेगातील वाहने अनियंत्रित होऊन (Road Accident) अपघात घडत आहेत. आताही असाच एक भीषण अपघात घडला आहे. बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा जागीच चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक प्रवासी थोडक्यात बचावला आहे. हा प्रवासी जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिक्षातून प्रवास करणारे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत अजून खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.

देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे एसटी बस आणि रिक्षा यांच्यात जोराची धडक झाली. विजयदुर्ग मालवण येथून बस नारिंगरे येथे येत असताना हा अपघात झाला. रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा एसटीला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मोठी बातमी! पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी

जेजुरीत भीषण अपघात

पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात बुधवारी (18 जून) झाला. या अपघातात एका महिलेसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनीसमोर ही घटना घडली. जेजुरी मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळ एक ढाबा आहे. या ढाब्यासमोर भरधाव वेगात असलेल्या कार आणि पिकअप टेम्पोची धडक झाली. हा टेम्पोतून येथे काहीजण साहित्य खाली उतरवत होते. नेमक्या याचवेळी ही धडक झाली. अपघात इतका भीषण होता की आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. आज सायंकाळी सव्वासात ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

follow us