Uday Samant on Ratnagiri Sindhudurg : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. शिंद गटाला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलण्याची नामुष्की आली. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदे गटाची मोठी दमछाक होतेय. या जागेवर लढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. मात्र, जागेवर भाजपने दावा केलाा. नारायण राणे (Narayan Rane) हे या मतदारसंघातून लढणार आहेत. त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली. मात्र, उदय सामंत (Uday Samant) यांनी रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर आमचाच हक्क असल्याचं सांगितलं.
लोकसभेचं तिकीट कापल्यानं भावना गवळी नाराज, शिंदेंनी दिली ग्वाही; म्हणाले, ‘वाऱ्यावर सोडणार नाही…’
वरिष्ठांनी संधी दिल्यास आपण लढू, असं म्हणत राणेंनी काल प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता रत्नागिरीत शिवसेनेचा मेळावा झाला. यावेळी बोलतांना उदय सामंत म्हणाले की, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा आहे. कारण, गेल्या वेळी या मतदारसंघातून शिवसेनेचे उमदेवार निवडून आले होते. आपण शिवेसेना उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. नंतर आम्ही गुवाहाटीला गेलो, ते आले नाही. त्यामुळं ही जागा शिवसेनेची आहे. धनुष्यबाण असलेल्या शिवसेनेची आहे, असं सामंत यांनी ठणकावून सांगितलं.
UdayanRaje Bhosle : ‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’
पुढं बोलतांना ते म्हणाले, कोकणाताल वातावरणं महायुतीला पाोषक आहे. ही जागा शिवेसनेला मिळाली तर शिवसेनाचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल. धनुष्यबाणवरचा उमेदवार लोकसभेत जावा ही माझी भावना आहे. त्यामुळं किरण सामंत यांनी उमेदवारी मिळावी, असं सामंत म्हणाले.
सामंत म्हणाले, हे शक्ती प्रदर्शन नाही. भाजपाला उमेदवारी मागण्याचा अधिकार तसा आम्हाला देखील
आहे. प्रत्येक पक्षाला एका मतदारसंघावर दावा करण्याचा अधिकार आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. हा मतदारसंघ नक्कीच शिवसेनेकडे राहील, असा आम्हाला अजूनही विश्वास आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, या जागेवर नारायण राणेंनी दावा केला असला तरी शिवसेनेने अजूनही या मतदारसंघावरील आपला दावा कायम ठेवला आहे. किरण सामंत यांना उमेदवारी देण्यात यावी, याबाबत कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत.. त्यामुळं रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हेच पाहणं महत्वाचं आहे.