मातोश्रीवरील ‘त्या’ बैठकीला मी हजर होतो, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा मी साक्षीदार आहे. योगेश कदम यांनी राजकीय कसं संपवायचं? त्यासाठी जे षडयंत्र रचले गेले होते त्या मातोश्रीवरील बैठकीला मी देखील होतो, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर आहेत म्हणून आमच्या चेहऱ्यावर […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (1)

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (1)

रत्नागिरी : आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा मी साक्षीदार आहे. योगेश कदम यांनी राजकीय कसं संपवायचं? त्यासाठी जे षडयंत्र रचले गेले होते त्या मातोश्रीवरील बैठकीला मी देखील होतो, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे.

आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर आहेत म्हणून आमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो आहे. दापोलीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत योगेश कदम यांना किती तिकिटं द्यायची यावर फार मोठी चर्चा झाली. योगेश कदम शिवसेनेचे आमदार पण सगळे तिकिटं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली, असा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं, मुख्यमंत्री शिंदेंचा ‘गोळीबार’

सकाळपासून चर्चा होती की सभा कशी होणार पण या सभेने दाखवून दिले आहे पुढचा आमदार योगेश कदमचं होणार आहे. पाच तारखेला झालेली सभा ही कार्नर सभा होती. त्या कार्नर सभेतून आमच्यावर टीका केली पण ती सभा विचार देणारी नव्हती तर फक्त शिवीगाळ करणारी सभा होती, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे.

गेल्या पन्नास वर्षात अनेक सरकारे गेली. अनेक मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं. आठ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी आम्हाला गुवाहाटी नेहून आणलं. काही लोकांच्या वर्मी लागल्याने ते अजून त्यातून बाहेर आलेले नाहीत, अशी टीका उदय सामंत यांनी केली. ते पुढं म्हणाले, आज कोकणाने पुन्हा एकदा निश्चय केलाय की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहोत म्हणजे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काय केलं? आताच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावणे चारशे कोटी दिले आहेत, असेही ते म्हणाले.

मागील अडीच वर्षात काय कामं केली हे 5 तारखेच्या सभेत ऐकायला भेटल असं वाटलं होत पण त्याठिकाणी सांगितले की माझ्या हातात काहीच नाही. मी काहीच देऊ शकत नाही. पण एकनाथ शिंदे याठिकाणी कोकणचा विकास करण्यासाठी आले आहेत, असे उदय सामंत म्हणाले.

Exit mobile version