मुंबई : निवडणूक आयोगाने चोमडेपणा करायचा गरज नाही. मी सहन करुन घेणार नाही. शिवसेना आमची आहे. तुमची परवागी घेऊन शिवसेनेची स्थापना झालेली नाही.हे सत्तेचे गुलाम आहेत. वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Central Election Commission) केली.
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्यावर अमिश शहा भयानक आरोप करुन आले. दोन कुटुंबाच्या हातात राज्य आहे. संगमांनी गरिबांचा पैसा खाल्ला. मेघालय सरकार देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. तरी संगमांनी यांच्या तंगड्या उतान्या केल्या.
शरद पवारांकडून नाना काटेंसह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना सूचना, म्हणाले…
निकाल लागल्यावर मोदींनी ट्विट केलं आपण दोघे मिळून सरकार स्थापन करु. लाज वाटत नाही का? निवडणुकीत ज्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी गोंडा घोळता? पुण्यात येऊन अमित शहा यांनी म्हटले होते की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले. आता तुम्ही संगमाचं काय चाटता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि भाजपला केला आहे.
भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारी. तुमच्याबरोबर आला म्हणजे स्वच्छ झाला आणि पलिकडे गेला म्हणजे भ्रष्टाचारी झाला? असं होऊ शकत नाही. पण संपूर्ण देश नासवण्याच काम हे लोक करत आहेत, अशी टीका भाजपवर केली. पुढं उद्धव ठाकरे म्हणाले, आज देखील शिवसेना मराठी माणसाचा आवाज आहे. ती संपण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शिवसेना प्रमुख आणि हिंदूह्रदय सम्राट एकचं. कोणी कितीही जन्म घेतले तरी त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. पण तुम्हाला शिवसेनेचा पक्ष प्रमुख मिंधे चालेलं का? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.