Download App

Vinayak Raut : मिंधे सरकार जबरदस्ती करतंय, त्रास देतंय, नेमकं चाललंय तरी काय?

शिंदे सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांवर जबरदस्ती, त्रास दिला जातोयं, राज्यात नेमकं चाललं तरी काय? असा सवाल उपस्थित करीत रिफायनरी प्रकल्पावरुन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी सरकारचे वाभाडेच काढले आहेत.

….असा जोर गुजरातच्या घशात प्रकल्प घालताना का लावला नाही? बारसूवरून नाना पटोले आक्रमक

दरम्यान, कोकणात आज रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झालीय. यावेळी कोकणातील लोकांकडून या प्रकल्पाचा कडाडून विरोध करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणांसमोर रस्त्यावरच आडवं होतं, जीवात जीव असेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

एकंदरीत या प्रकल्पाला कोकणातील अनेकांचा विरोध असल्याचं दिसून येतंय. या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारकडून मुंबईतल्या चाकरमान्यांच्या घरी जाऊन पोलिस फोटो घेत असून घरांवर नोटीस बजावत असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे. तसेच मुंबईतील लोकांना रेल्वे स्टेशनवरुनच उचलून थांबवलं जात आहे.

अतिक-अशरफच्या आयएसआय कनेक्शनबाबत मोठा खुलासा

रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेकदा कोकणवासियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे भेटीची मागणी केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांना भेटलेले नाहीत. एकीकडे लोकांना बैठकीला बोलवतात आणि दुसरीकडे तडीपारीच्या नोटीस पाठवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

रिफायनरी प्रकल्पाबाबत कोणत्याही प्रकारची पंचायत झाली नसून ग्रामसभा ग्रामपंचायचीचे ठराव हे ऐकून घेणं गरजेचं होतं पण ते का ऐकलं गेलं नाहीय? मुर्दाड सरकारनं ठरवलं आहे की, कोणतंही पत्र वाचायचं नाही पत्र फेकून द्यायचं, असा पवित्रा सरकारकडून घेतला जात असल्याचंही खासदार राऊत यांनी म्हंटलयं.

धर्माधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करा, खारघर प्रकरणी याचिका दाखल

दरम्यान, सत्ताधारी सरकारमध्ये ह्रदय असेल तर त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिलांची विचारपूस करावी. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिसिंग आहेत. त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय. त्याचप्रमाणे चांगले प्रकल्प गुजरातला पाठवायचे आणि विनाशकाही प्रकल्पासाठी सरकारला कोकण पाहिजे, असंही खासदार विनायक राऊतांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलनाप्रकरणी कोकणवासियांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत असून पत्रकारांशी बोलताना खासदार विनायक राऊतही चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज