Download App

Aditya Thackeray & Nilesh Rane ‘गांजाप्रमुखा’कडून दुसरी काय.., आमदार निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचलं

सिंधुदुर्ग : युवा सेना गांजाप्रमुखाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, या शब्दांत भाजपचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावलाय. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त ट्विटमध्ये स्मृतिदिन असा उल्लेख केल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलंय.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं होतं की, “हिंदु ह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोरेगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाला आज भेट दिली” असं या ट्विटमध्ये ठाकरे यांनी म्हंटल्याचा फोटो शेअर करत राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.

निलेश राणे ट्विटमध्ये म्हणतात, “याला जयंती आणि स्मृतिदिनामधला फरक नाही म्हणूनच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यातला फरक कळणार नाही, असंही आदित्य ठाकरेंना उद्देशून त्यांनी म्हंटलय. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ठाकरे यांचं ट्विट चर्चेत आलंय.

सतत आरोप-प्रत्यारोप करत राजकारणात सक्रिय असलेले निलेश राणे आणि आदित्य ठाकरे यांचं ट्विट आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार प्रस्थापित झाल्यापासून राणे कुटुंबियांकडून महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांसह शिवसेनेच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे.

नुकतंच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राणे कुटुंबियांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. याआधीही या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना क्लीनचीट मिळाली होती.

अखेर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राणे कुटुंबियांकडून करण्यात आली. त्यानंतर दिशा सालियन(Disha Salian) प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

दरम्यान, आता पुन्हा एकदा राणे कुटुंबियांकडून आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात आल्याचं दिसून येतंय. आता निलेश राणेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.

Tags

follow us