Kotwali Police Action Against Cafe Owners : अहिल्यानगरमध्ये कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. कॉलेजच्या मुला-मुलींना कॅफेच्या (Cafe) नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोर्ट गल्लीतील एका कॅफेत प्लायवूडचे कम्पार्टमेंट करून (Kotwali Police) पडदे लावून अंधार करण्यात आला होता. या ठिकाणी शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
हे वृत्त पोलीस निरीक्षक दराडे साहेब यांना मिळाल्याने त्यांनी खात्री करण्यासाठी वेगात यंत्रणा हलवली. कोतवाली गुन्हे शोध पथकास तोंडी आदेश देत त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा त्यांनी कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लील चाळे करताना रंगेहाथ (Ahilyanagar Crime News) पकडले. काउंटवर असलेल्या शिवप्रसाद नावाच्या व्यक्तीला त्यांनी ताब्यात घेतलं. त्याने कॅफेचा मॅनेजर असल्याचं सांगितलं.
”तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् ठाकरेंनी शब्द फिरवला”; रविकांत तुपकरांचा मोठा गौप्यस्फोट
त्यानंतर कॅफेच्या मालकाबाबत पोलिसांनी विचारणा केली (Crime News) असता, खराडे हेच कॅफेचे कामकाज पाहात असल्याचे शिवप्रसाद कुमारने सांगितलं. तसेच पोलिसांनी कॉलेजचे मुले अन् मुलींना त्यांचे नाव गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय आणि ओळखपत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडून दिले. सदर कॅफे शॉपचा चालक आणि मालक यांच्याविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात (Ahilyanagar News) आला आहे.
भव्य मंडप अन् नेतेमंडळीची धावपळ; आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी सुरू
ही कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा.अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे मसपोनि/योगीता कोकाटे, सपोनि विकास काळे , पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलिम शेख, चापोहेकॉ/संभाजी कोतकर, पोकों/अभय कदम, अमोल गाढे, रिंकु काजळे, अनुप झाडबुके, सतीष शिंदे, मपोकाँ/पुजा दिख्खत, कोमल जाधव, पल्लवी रोहकले यांच्या पथकाने केलीय.