Kunal Kamra : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. एका कार्यक्रमात कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात गाणं म्हटल्याने त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात खार पोलिसांनी चौकशीसाठी कुणाल कामरा याला समन्स देखील पाठवला आहे. तर आता या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार खार पोलीस ठाण्यात कुणाल कामरा याच्या विरोधात 3 स्वतंत्र्य गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तीन गुन्हेपैकी एक गुन्हा जळगावचे शिवसेना शहर प्रमुख यांच्या तक्रारीनुसार दाखल करण्यात आला आहे तर दोन गुन्हे नाशिकचे व्यवसायिक यांच्या तक्ररीनंतर दाखल करण्यात आले आहे. तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणात कुणाल कामरावर आतापर्यंत 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्याला दोन वेळा समन्स पाठवले असून आता तिसरा समन्स पाठवण्याची तयारी खार पोलीस करत असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीने (Mahayuti) या प्रकरणात कुणाल कामरा याला अटक करुन कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे तर महाविकास आघाडीकडून (MVA) कुणाल कामरा याला समर्थन देण्यात येत आहे. तर कुणाल कामरा याने देखील या प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला आहे. मी माफी मागणार नाही पण न्यायालयाने माफी मागण्यास सांगितली तर माफी मागेन असं कुणाल कामरा याने एका सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे.
एलोन मस्कने अचानक विकले X ; ‘या’ कंपनीसोबत तब्बल 33 अब्ज डॉलर्सचा करार केला
नेमकं प्रकरण काय?
एका कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राच्या सध्या राजकारणावर एक कविता सादर केली. या कवितेच्या माध्यमांतून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याने आपल्या कवितेत म्हटले की, ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….