Ladki Bahin Yojana : राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेत आता तब्बल 71 लाख महिलांना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत 71 लाख महिलांनी ई-केवायसीमध्ये दुरुस्ती न केल्याने त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार नसल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
आज शेवटची संधी
तर दुसरीकडे या योजनेत (Ladki Bahin Yojana) पात्र महिलांना ई-केवायसी करण्यासाठी आज (31 मार्च) शेवटीची संधी आहे. आज दिवसभरात या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिला ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात. जर तुमच्या केवायसीमध्ये काही चुक झाली असेल आणि तुम्ही दुरुस्ती केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे. त्यामुळे आज ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
71 लाख महिलांचा अर्ज बाद
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. पुरुष लाभार्थी, सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेतून बाद केले आहे. याचबरोबर ई-केवायसी न केलेल्या महिलांना देखील बाद करण्यात आले आहे. तसेच उत्पन्न गटात न बसणाऱ्या महिलांचे देखील लाभ सरकारकडून बंद करण्यात आले आहेत.
कोरेगाव पार्कात 18 रो हाऊस अन् 49 गुंठे…अररं! हा खरातचा सीए नेमकं काय करत होता?
तर दुसरीकडे राज्य सरकारच्या या योजनेत ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 1 कोटी 70 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती मात्र ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचा हप्ता बंद झाला आहे. ज्या महिलांनी चुकीचा पर्याय निवडला आहे त्या महिलांसाठी ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची आज शेवटची संधी आहे.
