कोरेगाव पार्कात 18 रो हाऊस अन् 49 गुंठे…अररं! हा खरातचा सीए नेमकं काय करत होता?
भोंदू अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळेची पुण्यातील कोरेगाव परिसरात तब्बल कोट्यावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय.
Ashok Kharat CA : बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाती रोजच नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांचं शोषण केल्याप्रकरणी एसआयटीच्या ताब्यात असलेल्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) संपत्तीबद्दल माहिती समोर येत असतानाच आता आणखी एक नवीन माहिती आलीयं. भोंदू अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळेची पुण्यातील कोरेगाव परिसरात तब्बल कोट्यावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय.
एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत; जमीन गैरव्यवहार प्रकरणात फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात खरातचा सीए प्रकाश पोफळे याचे आठ रो हाऊससेस, ४९ गुंठे जागेसह खरेदी केली. कागदोपत्री याची किंमत १९ कोटी ५६ लाख रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असून, लेन नंबर तीनमध्ये अनेक बड्या उद्योगपतींची बंगल्यांची मालमत्ता आहे. खरेदीची खरी किंमत शंभर कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.
खरातच्या सीएची एवढी मोठी संपत्ती पाहुन सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरश: डोळे पांढरे होण्याची वेळ आलीयं. अशोक खरातनंतर आता त्याचा सीए नेमकं काळा पैसा पांढरा करत होता का काय? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे. अशोक खरातचा सीए पोफळे खरातच्या सर्व काळ्या पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन करीत असल्याचा संशय पोलिस तपासाच बळवत आहे. यासोबतच शिवनिका ट्रस्टमध्ये जमा झालेला पैसा या मालमत्तांमध्ये गुंतवला असल्याची शक्यता बोलला जात आहे.
…तर तुम्ही स्वत: देव बनण्याचा प्रयत्न करू नका, मिटकरींचा नाव न घेता तटकरेंना इशारा
दरम्यान, आता या संपूर्ण मालमत्तांची खरेदी मागील किती वर्षांत झाली होती? ही संपत्ती घेण्यासाठी सीए प्रकाश पोफळे याच्याकडे एवढा पैसा आलाच कुठून? याचा तपास पोलिसांकडून सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. भोंदू खरातचे तत्कालीन भक्त असलेले सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी असा मी नामकर्ण हे आत्मचरित्र लिहिलंय. त्यात त्यांनी खरातला अद्भुत आणि चमत्कारिक पुरुषाचा दर्जा दिला आहे. २०१२मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात नामकर्ण यांनी खरातवर तब्बल १३ पानं खर्ची घातली आहेत. त्यातून खरातबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.