…तर तुम्ही स्वत: देव बनण्याचा प्रयत्न करू नका, मिटकरींचा नाव न घेता तटकरेंना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचे समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (NCP) यांच्या मतदारसंघांमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाला सुनील तटकरे यांच्या सोबतच मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात स्टेजवर लावलेल्या बॅनरवरची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
या कार्यक्रमसाठी लावलेला पोस्टरवर सुनील तटकरे, आदित्य तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो नसल्याचे दिसते आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय असं मिटकरी म्हणालेत.
रुपाली चाकणकरांनंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष कोण? या 5 नावांची चर्चा
ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करु नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, प्रोटोकॉल असं ट्वीट करत अमोल मटकरी यांनी नाव न घेता सुनिल तटकरे यांना टोला लगावलाय.
ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही.राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये.महाराष्ट्र हे सहन करणार नाही” दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशिवाय आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस मान्य नाही. परवा रायगड जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात या सर्वांचे फोटो वगळून कार्यक्रम घेण्यात आला ही गोष्ट मनाला पटणारी नसल्याचे मत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे फोट नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तटकरे कुटुंबियांवर टीका होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं जात आहे. तटकरेंवर टीका केली जात असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचे समोर आलं आहे. या बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.