Download App

खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आला, रक्षाबंधनापूर्वीच सरकारचं मोठं गिफ्ट…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

  • Written By: Last Updated:

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्या जमा होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महायुती सरकारने रक्षाबंधनापूर्वी आपल्या लाडक्या बहिणींना गिफ्ट दिलं.

‘लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ’; मनोज जरांगेंचा महायुतीवर हल्लाबोल 

 

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. ही योजना 1 जुलैपासून कार्यान्वित झाली असून आतापर्यंत 1 कोटी 35 लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 17 ऑगस्ट रोजी या योजनेचे पैसै पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. मात्र, त्याआधीच लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केलेत.

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5 हजार रुपये द्या, सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

त्यांनी लिहिलं की, राज्यभरात अत्यंत उस्फुर्त प्रतिसाद मिळालेल्या या योजनेसाठी राज्यभरातून कोट्यवधी माता-भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून मान्यता प्राप्त अर्जदारांना थेट खात्यांवर रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली.. ३१ जुलैनंतर ज्या महिलांना अर्ज दाखले केले, त्यातील पात्र माता-भगिनींनाही दुसऱ्या टप्प्यात योजनेचे पैसे मिळणार आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

आम्ही दिलला शब्द पाळतो आणि त्याची सुरुवात केली आहे. पैसे देण्याचे ट्रायल रन सुरू आहे. 17 ताऱखेला दोन हफ्ते देणार आहोत हे आम्ही सुरूवातीपासूच सांगतोय. आता आम्ही चेक करतोय पैसे जातात की नाही… 17 तारखेला आमच्या लाडक्या बहीणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे दोन हफ्त जातील. आता तुम्ही विरोधकांना विचारा, त्यांच्याकडे काय उत्तर आहे? अशी प्रतिक्रिया सीएम शिंदेंनी दिली.

दरम्यान, अर्ज केलेल्या 27 लाख महिलांची बॅंक खाती आधार कार्डशी लिंक नसल्याचे समोर आलं. त्यामुळं या महिला लाभापासून वंचित राहू शकतात. सरकारने अशा लाभार्थ्यांना 17 ऑगस्टपर्यंत त्यांची खाती लिंक करण्याचे निर्देश दिले.

follow us