धक्कादायक, गुजरातमधील शिक्षिका 8 वर्षांपासून अमेरिकेत अन् दरमहा खात्यात जमा होतो सरकारी पगार
Bhavnaben Patel : गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे पुन्हा एकदा देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. माहितीनुसार, गुजरातमधील बनासकांठा (Banaskantha) येथील एका सरकारी शाळेतील महीला मुख्याध्यापक गेल्या आठ वर्षांपासून शिकागो (Chicago) येथे राहत आहे मात्र तरीही देखील शाळेतून पगार घेत असल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आला आहे.
याप्रकरणी अधिकारी व पालकांनी तक्रारी केल्या आहेत. ते म्हणतात की हेड टीझर गेल्या 8 वर्षांपासून शिकागोमध्ये आहे. असे असतानाही शाळेतून पगार घेत आहे.
माहितीनुसार, अंबाजीतील पंच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावनाबेन पटेल (Bhavnaben Patel) यांच्याकडे यूएस ग्रीन कार्ड असून 2013 पासून त्या यूएसचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत. गेल्या 8 वर्षांपासून भावनाबेन पटेल एकही दिवशी शाळेत आलेले नाही. असं असून देखील शाळेच्या यादीत त्यांचे नाव कायम असून ते नियमित पगार घेत आहे. भावनाबेन पटेल दरवर्षी दिवाळीत गुजरातला भेट देतात त्यावेळी शाळांना सुट्टी असते. यावेळी ते शाळेत जात नाही किंवा विद्यार्थ्यांशी बोलत नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पालक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. शाळेच्या प्रभारी शिक्षिका पारुलबेन यांनी सांगितले की, भावनाबेन पटेल 2013 मध्ये अमेरिकेला गेल्या होत्या.भावनाबेन पटेल बराच वेळ शाळेत येत नसल्याचे समजताच त्यांनी याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिली. तर किमान दोन वर्षांपासून मुख्यधापकांना पहिले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, कॉलेजच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावनाबेन पटेल जानेवारी 2023 मध्ये शेवटच्या वेळी शाळेत आले होत्या आणि त्या दिवसांपासून त्या रजेवर आहे. या प्रकरणात आता अधिकाऱ्यांनी भावनाबेन पटेल यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे.