पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, तीन राज्यांमध्ये ब्लॅकआउट; एअर डिफेन्स सिस्टिम सक्रिय

Indo-Pak Ceasefire : युद्धाबंदीच्या अवघ्या तीन तासानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन (Indo-Pak Ceasefire) करण्यात आले आहे. माहितीनुसार, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरसह (Jammu and Kashmir) राजस्थान (Rajasthan) , गुजरातच्या (Gujarat) सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ड्रोनने हल्ले केले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील तीन राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि गुजरातच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याला भारतीय लष्कराकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आहे. भारतीय एअर डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली असून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
श्रीनगरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले
माहितीनुसार, पाकिस्तानकडून अखनूर आणि आरएस पुरा सेक्टरमध्ये युद्धाबंदीचे उल्लंघन केले आहे. बीएसएफकडून देखील याची पुष्टी करण्यात आली आहे. तर श्रीनगर आणि उधमपूरवर पाकिस्तानी ड्रोन दिसले असून भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तातडीने अँटी-ड्रोन सिस्टम सक्रिय केल्या. या प्रणाली हवेत पाकिस्तानी ड्रोनना निष्क्रिय करण्यास सक्षम आहेत. सीमेला लागून असलेल्या सर्व सेक्टरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या घुसखोरीला किंवा हल्ल्याला त्वरित आणि पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याचा स्पष्ट मेसेज लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना देण्यात आला आहे.
मोठी बातमी! पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करताच बाडमेर-जैसलमेरमध्ये पुन्हा ब्लॅकआउट; पहा व्हिडिओ
पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित
पाकिस्तानने युद्धाबंदी उल्लंघन केल्याने पंजाबमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. हवाई दलाच्या पठाणकोट आणि आदमपूर तळांवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लोकांनी रात्री घरात राहणे आणि लाईट बंद ठेवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.