Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (1500 रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर दिली आहे.
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट !
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) August 1, 2025
मोठी बातमी! ‘कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री’ ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
गेल्या काही दिवसांपासून जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत लाभार्थ्यांकडून विचारणा करण्यात येत होती. मात्र याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा करत जुलै महिन्याचा हप्ता 8 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे सरकारकडे लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.
‘12 वी फेल’ चित्रपटासाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार