लाडक्या बहिणींनो, खात्यात जमा होणार 3000? जाणून घ्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक असणारी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार या योजनेअंतर्गत दरमहा पात्र महिलांना 1500 हजार रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करते मात्र आतापर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा न झाल्याने हप्ता कधी बँक खात्यात जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने दिवाळी सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत सरसकट शेतकऱ्यांसाठी 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे इतर योजनांच्या निधीचंही नियोजन करण्यात येत असून यामुळेच आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर (November) महिन्याचे हप्ते रखडल्याची माहिती समोर येत आहे.

3,000 खात्यात जमा होणार ?

राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार जर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ऑक्टोबर (October) महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर पुढील महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मिहन्यांचे एकत्र 3 हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळू शकतात. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

‘मातृभूमी’साठी कडाक्याच्या थंडीत बर्फाळ पाण्यात उतरला सलमान खान ; अपूर्व लाखियांचा मोठा खुलासा

तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थी महिलांची e-KYC प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महत्त्वाची आहे. e-KYC किंवा आधार-बँक सीडिंगसारख्या बाबी अपूर्ण असल्यास हप्ता मिळण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लाभार्थींनी आपली e-KYC, आधार लिंकिंग आणि DBT स्थिती तपासून घेणे गरजेचे आहे.

Exit mobile version