लाडक्या बहिणींना धक्का; तब्बल 80 लाख महिलांच्या खात्यात जमा होणार नाही 1500 रुपये

Ladki Bahin Yojana :   राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana :   राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी ई- केवायसी करण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत देण्यात आली होती मात्र 30 एप्रिलपर्यंत जवळपास 80 लाख महिलांनी ई-केवायसी न केल्याने आता त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर दुसरीकडे या योजनेत ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार नाही असं देखील सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी (E-kyc) करण्याचे सूचना या योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) पात्र महिलांना देण्यात आल्या होत्या. ई-केवायसी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत आता संपली आहे. त्यामुळे आता या योजनेत तब्बल 80 लाख महिलांना लाभ मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे. ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारकडून नोव्हेंबर 2025 पासून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती मात्र आता राज्य सरकार ई-केवायसीसाठी मुदतवाढ देणार नसल्याने 80 लाख महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता मिळणार नाही.

महिला अपात्र ठरण्याची मुख्य कारणे

वेळेत ई-केवायसी पडताळणी पूर्ण न करणे आणि माहिती अपडेट न करणे.

अर्जासोबत अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे जोडणे.

उत्पन्नाचे आणि पात्रतेचे निकष पूर्ण न होणे .

वैयक्तिक माहितीमध्ये तफावत आढळणे.

अहिल्यादेवींच्या कार्यक्रमात झिंगाट गाणे…रोहित पवारांनी शिंदेंचे शाब्दिक कान टोचले-

follow us