महसूल विभागात जमीन मोजणी फक्त 30 दिवसांत होणार, बावनकुळेंचा क्रांतिकारी निर्णय

Land census महसूल विभागाकडून फक्त तीस दिवसांमध्ये जमीन मोजणी केली जाणार आहे. बावनकुळे यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

WhatsApp Image 2025 10 11 At 10.19.00 AM

WhatsApp Image 2025 10 11 At 10.19.00 AM

Land census by revenue department in just 30 days, revolutionary decision of Bawankule : राज्यामध्ये राज्य सरकारकडून राज्यातील शेतकरी आणि भूधारकासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महसूल विभागाकडून फक्त तीस दिवसांमध्ये जमीन मोजणी केली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोट्यावधी जमीन मोजणीची प्रकरण मार्गी लागतील.

मविआ नेत्यांसोबत राज ठाकरेही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, फडणवीस, शिंदेंनाही निमंत्रण, राऊतांची माहिती

दरम्यान नागरिकांच्या पोट हिस्सा, हद्द कायम, बिनशेत, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वन हक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी, व सीमांकन तसेच मालकी हक्कासाठी ही मोजणी प्रक्रिया अत्यावश्यक असते. या मोजणी प्रकरणांचा 30 दिवसात निपटारा करण्यासाठी सरकारकडून परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

आता 200 रुपयांत होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी…

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जमिनीच्या हिस्सेवाटप प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली. आता जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयांमध्ये होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.

ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा अतिरिक्त 100 टक्के टॅरिफ! अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणुकदारांनी दीड लाख कोटी डॉलर्स गमावले

दरम्यान, जमीन मोजणी प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. पूर्वीसारख्या कार्यालयाता खेटा मारण्याची गरज नाही. एका क्लिकवर काही कागदपत्रांसह शुल्क भरून जमीन मोजणीसाठी अर्ज करता येतो. केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय मंत्री बावनकुळेंनी घेतला.

Exit mobile version