कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी मोठा दिलासा! महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय…

कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी 200 रुपयांचे शुल्क भरुन हस्तांतरण करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतल्याचं मंत्री बावनकुळेंनी जाहीर केलं.

Untitle (31)

Untitle (31)

Land Transfer by Gift : आता कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी फक्त 200 रुपयांचे शुल्क भरुन हस्तांतरण (Land Transfer) करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे कौटुंबिक मालमत्तेचे हस्तांतरण अधिक सुलभ, किफायतशीर आणि नागरिकाभिमुख होणार आहे. तसेच, या प्रक्रियेसाठी होणारा खर्च वाचणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याआधी बक्षीसपत्र नोंदविण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण यांना बक्षीसपत्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या तीन टक्के इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. इतर सर्व बक्षीसपत्रासाठी खरेदीखताप्रमाणे पूर्ण स्टॅम्प ड्युटी आकारली जात होती. मात्र आता कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी केवळ 200 रुपये लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.

एखाद्या जमिनीचा मालकी हक्क ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. शेतजमीन, घर, फ्लॅट, आदी मालमत्ता जवळच्या नात्यातील व्यक्तीला द्यायची असल्यास भविष्यात होणारे वाद टाळण्यासाठी अधिकृत कागदपत्रे केली जातात. त्यालाच बक्षीसपत्र म्हणतात. बहुतांशी वेळा जवळच्या नात्यामध्ये प्रेमापोटी, आपुलकीपोटी केला जाणाऱ्या ह्या दस्ताबद्दलच्या कायदेशीर तरतुदी ह्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट च्या कलम १२२ ते १२६ मध्ये अंकित केलेल्या आहेत.

मालमत्ता हस्तांतरणाचे नियम काय आहेत?
मालमत्ता देणारा जो आहे, त्याने ते स्वेच्छेने दिलेले असले पाहिजे. प्राप्तकर्त्याने ती देणगी स्वीकारली पाहिजे. मालमत्ता ट्रान्सफर करता नोंदणी करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेच्यावेळी किमान दोन साक्षीदार असणे आवश्यक आहे.

राज्यभर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; मुंबईतील नामांकित स्पोर्टस् क्लबसह अनेक हॉटेलांचे FSSAI परवाने निलंबित

मालमत्ता हस्तांतरण करताना कुठली कागदपत्रं हवी…
मालमत्तेचे हस्तांतरण करताना कायद्यानुसार काही सामान्य मालमत्ता हस्तांतरण कागदपत्रे आवश्यक असतात. मूळ मालमत्ता हक्कपत्र, दोन्ही पक्षांचा ओळखीचा पुरावा, दानपत्र किंवा मृत्युपत्र, बोजा प्रमाणपत्र, मालमत्ता कराच्या पावत्या, पॅन/आधार तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो, साक्षीदाराचा तपशील

Exit mobile version