कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी मोठा दिलासा! महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय…

कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी 200 रुपयांचे शुल्क भरुन हस्तांतरण करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतल्याचं मंत्री बावनकुळेंनी जाहीर केलं.

Untitle (31)

Land Transfer by Gift : आता कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी फक्त 200 रुपयांचे शुल्क भरुन हस्तांतरण (Land Transfer) करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे कौटुंबिक मालमत्तेचे हस्तांतरण अधिक सुलभ, किफायतशीर आणि नागरिकाभिमुख होणार आहे. तसेच, या प्रक्रियेसाठी होणारा खर्च वाचणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याआधी बक्षीसपत्र नोंदविण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण यांना बक्षीसपत्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या तीन टक्के इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. इतर सर्व बक्षीसपत्रासाठी खरेदीखताप्रमाणे पूर्ण स्टॅम्प ड्युटी आकारली जात होती. मात्र आता कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी केवळ 200 रुपये लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.

follow us