Download App

ठाकरे बंधूंच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार ; वकील गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसे प्रमुख राज ठाकरे अन् शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध केला. शासनाने निर्णय मागे घेतला. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विजयी मेळावा साजरा केला. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna Sadavarte) ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं आहे.
उज्ज्वल निकम आता राज्यसभेत; संतोष देशमुख हत्याकांड खटला सोडणार ?

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

या देशात चळवळी विचारांवर उभ्या राहतात. आता जी चळवळ आहे, त्याने देशभरातली हिंदी भाषिक जोडली गेली आहेत. भाषेच्या नावावर कोणी कापाकापी करू नये. जे कापाकापी करतात, त्यांना घरात बसवलं (Maharashtra Politics) पाहिजे. या महाराष्ट्रात तिसरी भाषा शिकलीच जाईल. कारण केंद्राची गाईडलाईन आहे. उद्धव, घरातल्या आरशात बघा. विनय शुक्ला हे हिंदी भाषेचे शिक्षक आहेत. ते कोणाला शिकवतात उद्धव? असा सवाल सदावर्तेंनी केलाय. मातोश्रीतील आरशात बघून उद्धवने माध्यमांसमोर उत्तर द्यावं, असं आव्हानच सदावर्ते यांनी दिलंय.

तांदळातील खड्यासारखे

आज राष्ट्रहिताची भाषा हिंदी बनलेली आहे. महाराष्ट्रात दोन कोटी लोकं हिंदी भाषिक आहे. विरोध करणाऱ्यांनो, उद्धव दोन कोटी लोकं हिंदी भाषिक आहेत, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. तांदळातील खड्यासारखे (Hindi Compulsory) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखी लोकं आहेत. जी भाषेच्या नावावर आनागोदी आणायला पाहात आहे. तुम्हाला सांगायचं आहे राज ठाकरे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मालदीवसारख्या देशात हिंदी भाषा अनिवार्य झाली आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदी बोललं जातंय. या सगळ्या गोष्टी लक्षणीय आहे.

भाविकांनो लक्ष द्या! तुळजाभवानी मंदिर आता फक्त 19 तास खुलं, वेळेची मर्यादा…

गरिबांच्या मुलांचं नुकसान

राज ठाकरे सारख्या विचारांना पूर्णविराम. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कथनीत आणि करणीमध्ये फरक आहे. तिसरी भाषा दिलीच गेली पाहिजे. तिसरी भाषा न शिकल्यामुळे गरिबांच्या मुलांचं नुकसान होणार आहे. रद्द केलेला निर्णय पुन्हा घ्यावा. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या लोकांनी जे तोडण्याचं काम सुरू केलं आहे, ते थांबण्यासाठी उच्च न्यायालयात येत्या आठवड्यात धाव घेतली जाणार आहे, असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.

 

follow us