Laxman Haake on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा काढणार आहेत. त्या अगोदर त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. दरम्यान, यावर आता लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केला आहे जरांगेंची मतदारसंघात एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10 ते 15 लाख रुपये देतात असा आरोप हाके यांनी केला आहे. (Jarange Patil) आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला ही व्यवस्था हाती घ्यायची आहे, नोकरशाहीत आपले लोक घुसवायचे आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यातील मांजरसुंभ्यात एक निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीवरून लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या या बैठकीसह इतर बैठका या सरकार पुरस्कृत असल्याचं हाके म्हणाले. जरांगेंना आमदार पैसे देतात, यामुळेच मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावातही जरांगेंची मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लागल्याचं हाके म्हणाले आहेत.
तुम्ही फक्त यावेळी मराठ्याच्या पोरांना डिवचून दाखवा मग,जरांगे पाटील बीडच्या सभेत आक्रमक
ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर हाकेंनी पुन्हा एकदा बोचरी टीका केली.
मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत. अमोल मिटकरी हे अजित पवारांनी विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा असल्याचा प्रहार हाकेंनी केला. बिग बॉसच्या घरात अमोल मिटकरी चार-पाच तासही टिकणार नाहीत, असा चिमटा हाकेंनी मिटकरींना काढला. तिथून बाहेर आल्यानंतर त्यांना काही काम उरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील काही तमाशा मंडळाना आपण त्यांच्यासाठी सोंगाड्या किंवा ढोलकीवाला म्हणून काम देण्यासाठी विनंती करणार असल्याचा टोला हाकेंनी मिटकरींना लगावला.