तुम्ही फक्त यावेळी मराठ्याच्या पोरांना डिवचून दाखवा मग…,जरांगे पाटील बीडच्या सभेत आक्रमक

Manoj Jarange Patil In Beed : मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्ट रोजी आंदोलनासाठी मुंबईकडे मोर्चा घेऊन जाणार आहेत. या आंदोलनादरम्यान लाखो मराठा बांधव मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. (Jarange Patil) याआधी जरांगे यांच्याकडून दौरे सुरू असून ते मराठा समाजाला जास्तीत जास्त संख्येने मुंबईत जमा होण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसंच, मराठ्यांच्या पोरांना डिवचलं तर मी सोडणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
आमच्या उभ्या पिढ्यांचं वाटोळं झालं. आजकाल उन्हातान्हात कोणीही बसत नाही. विचार करून पुढच्या लढाया जिंकायच्या आहेत. चलो मुंबई. आता 29 ऑगस्टला फाईटच आहे. मला मुंबईत मारतील, असे सांगत होते. तुम्ही रक्ताच्या थारोळ्यात माझ्या माय-बहिणी टाकल्या आहेत. पण यावेळी तुम्ही फक्त पोरांना डिवचून दाखवा. मराठ्यांची औलाद काय आहे, हे आम्ही तुम्हाला दाखवतो. आपल्याला मुंबईत शांततेत जायचं आहे, असं आवाहनही त्यांनी उपस्थित मराठा बांधवांना केलं.
मोठी बातमी! हिंजवडी आयटी पार्क हादरलं; फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक
माझ्या जातीला कोणी विनाकारण टोकलं तर मी सोडत नाही. फडणवीस डीवायएसपी यांना चिल्लर चाळे करायला लावत आहेत. माझी जात शांततेत मागणी करत आहे. तुम्ही माझ्या जातीला डिवचले जात आहे. डीजा हा मराठ्यांना छेडण्याचा विषय आहे का? फडणवीस यांचे ऐकून बीडमध्ये दंगल घडवण्याचा विचार होता का? असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.
आरक्षण न दिल्यास काय ते आता मुंबईत गेल्यावर सांगतो. आता त्यांची पळापळी सुरू झाली आहे. मराठ्यांची दखल घेतली गेली नाही. मराठ्यांच्या मागण्यांकडं लक्ष दिलं गेलं नाही. माझ्या लेकराबाळांचा प्रश्न आहे. म्हणूनच मला मुंबईला यायचं आहे. तुम्ही आमच्या मागण्या करा. आम्ही मुंबईला येणार नाहीत. आम्ही इथूनच मंत्रालयावर गुलाल फेकू, अशी मागणीही त्यांनी केली. तसंच, मराठा समाजावर प्रश्न उपस्थित केले जातील असे कोणतेही कृत्य करू नये. दगडफेक, जाळपोळ करू नये असंही आवाहन जरांगे यांनी आपल्या मराठा बांधवांना केलं आहे.