Laxman Hake On Manoj Jarange Patil : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील ओबीसीमधून (OBC) मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. यासाठी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना देखील झाले आहे. तर दुसरीकडे आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगेसह राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत लक्ष्मण हाके यांनी इशारा दिला आहे त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके दरम्यान आरोप- प्रत्यारोप सुरु होताना दिसत आहे.
माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची मागणी बेकायदा आहे. राज्य सरकारने त्यांना फॅक्ट समजून सांगितलं पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात अराजक निर्माण होऊ शकते असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले. तसेच मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरांगेंच्या मागणीचा अर्थ होतो असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
पुढे माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन पुकारतील त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या दहापट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल असा इशारा देखील यावेळी माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे आणि राज्य सरकारला दिला.
नियमांत आंदोलन व्हावा, आम्हाला अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
अजित पवारांच्या आमदारांनी जरांगेंना रसद पुरवली
तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगे कधी कोणाची स्तुती करतील आणि कोणाच्या रसदीवर आंदोलन उभं करतील याचा नेम नाही. अजित पवारांच्या आमदारांनी जरांगेंना रदस पुरवली आहे. जरांगे पाटील मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात खालच्या स्थरावर जाऊन टीका करतात मात्र तरी देखील सत्तेतील माणसं जरांगे पाटील यांना रसद पुरवत आहेत असा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना केला.