येडपट-खुळचट जरांगेंचं आंदोलन सत्तेच्या खेळासाठी…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

येडपट-खुळचट जरांगेंचं आंदोलन सत्तेच्या खेळासाठी…; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Laxman Hake : मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण (OBC Reservation) मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा आक्रमक झालेत. 27 ऑगस्टला ते आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेला रवाना होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला, यावेळी हाकेंनी जरांगेंवर सडकून टीका केली. जरांगे हा खुळचट अन् येडपट आहे, त्याला बोगस कुणबी नोंदी तयार करून ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायची आहे, अशी टीका हाकेंनी केली. तसंच जरांगेंचं आंदोलन सत्तेच्या खेळासाठी सुरू आहे, असंही हाके म्हणाले.

प्रतिक्रिया देऊ नका, आरक्षणासाठी जरांगे ॲक्शन मोडमध्ये येताच उपमुख्यमंत्री शिंदेंचे मंत्र्यांना आदेश 

हाके म्हणाले, जरागेंना एकच विचारा, धनगर ओबीसींमध्ये येतो की नाही? धनगर समाजाला मिळालेल्या २७ टक्के आरक्षणातून धनगर समाज साडेतीन टक्के आरक्षण घेतो.. मी फक्त धनगर समाजांची बाजू घेत नाही, मी ओबीसींमधल्या साडेचारशे जातींचं बोलतो. आमची झोपडी तुला देऊन आम्ही बेदखल होऊ का? जरांगे ज्या कुणबी नोंदीविषयी बोलतोय, त्या महसुली नोंदी आहेत. ब्राम्हणांच्या देखील कुणबी नोंदी आहेत, मग त्यांनाही आरक्षण द्यायंच का? असा सवाल हाकेंनी केला.

आरक्षण द्यायला तुझ्या बाबाचा कायदा आहे का?
जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण कशाला पाहिजे, त्याला वातावरण बिघडवायंच आहे. जरागेंना काय कळतं आरक्षणातलं? आरक्षण द्यायला तुझ्या बाबाचा कायदा आहे का? मोर्चा घेऊन गेल्यावर आरक्षण मिळतं का? राज्य मागासवर्ग आयोगाला अधिकार आरक्षणाचा असतो, मुख्यंत्र्यांना नसतो. आणि आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण नाकारलं. आता तुम्हाला बोगस कुणबी नोंदी तयार करून ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करायची का?, असा सवाल हाकेंनी केला.

जरांगेंचं आंदोलन सत्तेच्या खेळासाठी
मराठा बांधवांना माझी विनंती आहे, या येडपटाच्या नादाला लागू नका. याच्या नादाला लागून सामाजिक स्वास्थ बिघडवू नका. जरांगे हा खुळचट अन् येडपट आहे, अशी टीकाही हाकेंनी केली. तसंच जरांगेंचं आंदोलन सत्तेच्या खेळासाठी सुरू आहे. लोकसभेला याने कोणाचा प्रचार केला हे महाराष्ट्राला माहित आहे, जरांगेंच्या मागे अजितदादा पवारांचे आमदार आहेत, असं हाके म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube