प्रतिक्रिया देऊ नका, आरक्षणासाठी जरांगे ॲक्शन मोडमध्ये येताच उपमुख्यमंत्री शिंदेंचे मंत्र्यांना आदेश

Eknath Shinde On Manoj Jarange Protest : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) आरक्षणासाठी आंदोलन करणार आहे. यासाठी उद्या 27 ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीमधून निघणार आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य न करण्याची ताकीद दिली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य न करण्याची ताकीद दिली आहे. याच बरोबर शिंदे हे दरे गावात जाणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या मौन बाळगून असल्याने महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा होताना दिसत आहे.
तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. मात्र त्यांच्या आंदोलनापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करत मोठा निर्णय दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायलयाने दिला आहे.
मोठी बातमी, माता वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर भूस्खलन; पाच जणांचा मृत्यू
तर दुसरीकडे मुंबईतील इतर योग्य ठिकाणी आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांनी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.