नियमांत आंदोलन व्हावा, आम्हाला अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट

Devendra Fadnavis On Manoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारवर दबाव टाकला आहे. समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. आंदोलनासाठी 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाले आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलनाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. कुणाचाही आरक्षण काढून घेतले जाणार नाही. अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं ते न्यायालयात देखील टिकले. कुणाचाही आरक्षण काढून घेतले जाणार नाही असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करुन मागणी करावी. लोकशाही मार्गाने आंदोलन करावे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजासाठी योजना आमच्या सरकारच्या काळात सुरु झाल्या. सारथीची स्थापना आमच्या सरकारने केली. पण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना प्रलंबित का होती? तेव्हा राज्यात कोणाची सत्ता होती. मराठा समाजासाठी सर्वात जास्त योजना आमच्या सरकारने लागू केल्या आहेत असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Ganesh Vandana : नागेश मोरवेकर आणि आदित्य जी नायर यांच्या सुमधूर आवाजात गणेश वंदना
तसेच लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नियमांत आंदोलन होत असेल तर आम्हाला कोणतीही अडचण नाही असं देखील माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.