मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत बिघडली; उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल
मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे (Jarange) पाटील यांची प्रकृती अचानकपणे खालावली असल्याचं समोर आलं आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ते नांदेड दौऱ्यावर असताना ही घटना घडली.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा शड्ड ठोकला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते राज्यभरातील मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत. हा मोर्चा एकदा मुंबईत आला तर काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी सरकारला दिलाय.
तेव्हा माझ्या आईवर बोलले होते, आताही उपोषणामुळे डोक्यावर परिणाम; फडणवीसांचा जरांगेंना टोला
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना त्रास होत असल्याचं समोर येताच डॉक्टरांनी त्यांची तत्काळ तपासणी केली. नांदेडच्या शासकीय विश्रामगरात डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे.
दुसरीकडे नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील एक बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाभरातून मराठा बांधव आले होते. मात्र, यावेळीच या बैठकीत चोरटे शिरल्याचे समोर आले. चोरट्यांनी अनेकांची पाकिटे पळवली आहेत. यापैकीच एक चोर चोरी करताना मराठा बांधवांच्या हाती लागला आहे. त्यानंतर मराठा बांधवांनी त्या चोराला चांगालच चोप दिला. वेळेत पोलिसांनी हस्तक्षेप करून चोरट्याला घेतलं ताब्यात.