…तेव्हा माझ्या आईवर बोलले होते, आताही उपोषणामुळे डोक्यावर परिणाम; फडणवीसांचा जरांगेंना टोला

Devendra Fadanvis : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची टीकेची धार दिवसेंदिवस वाढू लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांच्या टीकेचे लक्ष आहेत. जरांगेंनी फडणवीसांवर दंगल भडकवण्याचा आरोप केला. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
HSRP Number Plates: वाहनधारकांना दिलासा; HSRP प्लेटसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
मागच्या वेळी उपोषणाच्या शेवटी जरांगे माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफीही मागितली होती. आताही उषोषणामुळे जरांगेंचा संताप होतोय, असं फडणवीस म्हणाले.
उपोषणामुळे डोक्यावर परिणाम
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जरांगेंच्या आरोपाविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले की, यांनी मागच्या वेळी उपोषणाच्या शेवटी जरांगे माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफीही मागितली होती आणि सांगितलं होतं की, जरा उपोषणामुळे डोक्यावर परिणाम झालाय, त्यामुळं मी रागारागाने बोललो, असं ते म्हणाले… आपण असं समजूया, आताही उषोषणामुळे जरांगेंचा संताप झाला. एवढंच सांगतो, एक नॉर्मल प्रक्रिया आहे, क्रिमीनल केसमध्ये तुम्ही हजर झाला नाहीतर तुमचा नॉनबेलेबल वॉरंट निघतो, तुम्ही हजर झाला तर वॉरंट कॅन्सल होता, असं फडणवीस म्हणाले.
जरांगे काय म्हणाले होते?
फडणवीसांनी ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. त्यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे. फडणवीस हे षडयंत्र रचत असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. आधी चर्चा खोटी वाटत होती, मात्र सिद्ध झाले आहे. मी मॅनेज होत नाहीय, त्यामुळ फडणवीसांना माझ्यावर हल्ला करायचा आहे, पण फडणवीस यांनी माझ्या नादाला लागू नये, असंही जरांगे म्हणाले होते. तसंच आमचे आंदोलन शांततेत होणार आहे. पण फडणवीसांनी जर तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कायम स्वरुपी बंद राहील, असा इशारा जरागेंनी दिला होता.
जरांगेंचा मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि ‘सगेसोये अध्यादेश लागू करावा, या मागण्यांसाठी जरांगेंचा मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. जरांगेंनी समाज बांधवांना या मोर्चात सामील होण्याचे आवाहन केलं. या पार्श्वभूमीवर ते मराठवाड्यात संवाद दौरा करत आहे.