HSRP Number Plates: वाहनधारकांना दिलासा; HSRP प्लेटसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

HSRP Number Plates : लाखो वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याच्या अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी जुन्या वाहनांना 15 ऑगस्ट 2025 पर्यंत एचएसआरपी पाटी (HSRP Number Plates) बसविण्याचे आदेश राज्य सरकारकडून वाहनधारकांना देण्यात आले होते मात्र आता राज्य सरकारने ही मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहनांवर एचएसआरपी नंबर पाटी बसवण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी असं राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे 30 नोव्हेंबर 2025 नंतर एचएसआरपी पाटी न बसविणाऱ्या वाहनांवर 1 डिसेंबर 2025 पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील सह परिवहन आयुक्त शैलेश कामत (Shailesh Kamat) यांनी दिली आहे.
वाहनधारकांना दिलासा तर दुसरीकडे राज्य सरकारकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र आतापर्यंत अनेक वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नसल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता लाखो वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
अरमान मलिक दोन नाही तर चार महिलांचा पती; न्यायालयाने पाठवले समन्स
वाहनधारक आता 30 नोव्हेंबरपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवू शकतात. याच बरोबर 1 डिंसेबर 2025 पासून एचएसआरपी नंबर प्लेट न बसवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील सरकारकडून देण्यात आली आहे.