Laxman Hake Criticized Anjali Damania On Dhananjay Munde OBC Leaders : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी काल पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) पावणे तीनशे कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे मुंडेंनी दमानिया यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. आता या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची देखील एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी राज्यात ओबीसी नेत्यांविरूद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केलाय.
मोठी बातमी! रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ; दोन बंधुंच्या घरी ईडीने टाकला छापा
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके धनंजय मुंडे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. हाकेंनी अंजली दमानिया यांच्यावर टीका केलीय. त्यांचं नाव अंजली दलालिया असायला हवं असं, अशा शब्दांत त्यांनी घणाघात केलाय. सोबतच राज्यातील ओबीसी नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जातंय, असा आरोप देखील हाकेंनी केलाय. त्यामुळं राजकीय वातावरण आणखीनच तापलंय.
निवडक नेत्यांना राजकारणातून संपवायेच, हा अंजली दमानिया यांचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात त्यांनी जेवढी प्रकरण उपस्थित केली, त्यांचे पुढे काय झालं, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्या मीडियात फक्त स्पेस शोधण्याचं काम करतात. दमानियांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये, असं देखील हाकेंनी म्हटलंय. तर निर्णय प्रक्रियेमधून ओबीसींना बाजूला करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप अन् टार्गेट करण्यामागे मोठं षडयंत्र असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. रोहित पवार यांच्या आयटी सेल सोशल मीडियावर ओबीसी नेत्यांना बदनाम करण्याचं काम करत आहे, असा आरोप देखील हाकेंनी केलाय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान;सकाळी ९ वाजेपर्यंत 8.10 टक्के झालं मतदान
पहिल्या दिवसापासून धनंजय देशमुखांची भूमिका अतिशय समतोल आहे. त्यांनी मनोज जरांगेंच्या नादाला लागू नये, असं देखील त्यांनी म्हटलंय. दोन समाजांत तेढ निर्माण करण्यासाठी ते कारणीभूत आहे. धनंजय देशमुखांच्या भूमिकेचं पहिल्या दिवसापासूनच मी स्वागत केलंय. जर ते जरांगेंच्या नादाला लागले, तर दु्र्दैवाने या घटनेचं गांभीर्य कमी होवू शकतं, अशी भीती देखील लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केलीय. मनोज जरांगेंनी मिडीयाचे बूम बघितले नाही, तर जरांगेच्या परिणाम होईल अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केलीय.